Current
दृष्टीक्षेप: 

योजनेचे नाव: स. क्र. १७५ भाग, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे येथील ७३ सदनिका उच्च उत्पन्न गट २० दुकानाची योजना

८५२० चौ.मी. जमीन भूसंपादन कायदयान्वये प्राप्त झाला असून ४४ सदनिका मध्यम उत्पन्न गट योजना राबविण्यात येवून लाभार्थ्याना वाटप करण्यात आलेले आहे. उर्वरीत जमीनीवर ७३ सदनिका उच्च उत्पन्न गट २० दुकानांची योजना प्रस्तावित आहे. वसाहतीच्या भू-अभिन्यासामधून १२ मी रूंदीचा विकास आराखडयातील रस्ता आहे. संत तुकाराम नगर, पिंपरी येथील वाय सी एम हाँस्पीटलच्या मागे विकसीत जागी योजना असून पुणे-मुंबई जुन्या महामार्गापासून अंदाजे २.०० किमी अंतरावर आहे.
शाळा, इस्पितळ, दुकाने, एस टी स्डँण्ड, क्रिंडागण इ सोयी जवळच उपलब्ध आहे. भू अभिन्यास व नकाशा यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मंजूरी दिलेली आहे.

मजल्याचा आराखडा:
ठळक वैशिष्टे: 

योजनेचे नाव: ७३ सदनिका उच्च उत्पन्न गट २० दुकानांची योजना

ठिकाण: स. क्र. १७८ भाग, संत तुकाराम नगर, पिंपरी

योजनेचा प्रकार: उच्च उत्पन्न गट दुकाने

एकूण सदनिका: ७३ सदनिका + २० दुकाने

सदनिकेत द्यावयाच्या सुविधा

 • एम २० काँक्रीटमधील पाया व फ्रेम स्ट्रक्चर
 • बाहेरील भिंती : १५० मिमी जाड ठोकळा वीट
 • आतील भिंती : ११५ मिमी वीटकाम.
 • मुख्य दरवाजा : सुबक साँलीड कोअर फ्लश दरवाजे सागवानी फ्रेमसह
 • आतील दरवाजे :साँलीड कोअर फ्लश दरवाजे फ्रेस मेटल फ्रेमसह
 • संडास दरवाजे: पी व्ही सी शटरचे दरवाजे अँल्युमिनियम फ्रेमसह
 • खिडक्या: अँल्युमिनियमच्या खिडक्या लोखंडी जाळीसह
 • फ्लोंरीग:
  • हाँल व बेडरूमसाठी व्हिट्रीफाईड टाईल्स
  • स्वंयपाक घरासाठी कोटा टाईल्स
  • संडास/बाथरूमसाठी सिरँमिक टाईल्स डँडोसह
  • जिन्यासाठी कोटयाचे टप्पे
  • पार्कीग व निवडक परिसर पेव्हल ब्लँक
 • बाहेरील गिलावा : २ स्तरांमधील वाळूचा गिलावा
 • आतील गिलावा : १२ मिमी नीरू फिनिशचा गिलावा
 • छ्ताचा गिलावा : ६ मि.मी. नीरूचा गिलावा
 • बाहेरील रंग : सिमेंट पेंट + सिटेक्स पेंट
 • आतील रंग : आँईल बाउड डिस्टेंपर
 • किचन ओटा : पाँलिश कडाप्याचा टाँप
 • संडास भांडे : ओरीसा प्रकार
 • विद्युतीकरण : तांब्याच्या तारेसह केसींग केपीग
योजनेचा तपशिल: 

इमारत क्र. बी१: (१४ सदनिका + ४ दुकाने)-जोते पूर्ण.

इमारत क्र. बी२: (१७ सदनिका + ४ दुकाने)- पायाचे काम पूर्ण.

इमारत क्र. बी३: (१४ सदनिका + ४ दुकाने)- खोदाई प्रगतीपथावर.

इमारत क्र. ए१: (१४ सदनिका + ४ दुकाने)- पायाचे काम पूर्ण.

इमारत क्र. ए२: (१४ सदनिका + ४ दुकाने)- आखणी पूर्ण., (७३ सदनिका + २० दुकाने)- खोदाई सुरू होईल.

इतर प्रकल्प पहा