

अ. क्र. | संक्षिप्त नाव | पदनाम | विभाग | संपर्क |
---|---|---|---|---|
1 | - | अध्यक्ष |
०२२-६६४०५३६३ / ६६४०५३६७ कामाचे तास - सकाळी ०९:४५ ते संध्याकाळी ०६:१५ आठवड्याचे दिवस सार्वजनिक सभेसाठी दिवस/वेळ आणि तास: कृपया नोंद घ्या - माननीय राष्ट्रपती दौऱ्यावर असताना वरील वेळ लागू होणार नाही. |
|
2 | ![]() श्री. संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) |
उपाध्यक्ष तथा & मुख्य कार्यकारी अधिकारी | ६६४०५४०१ vpceo@mhada.gov.in |
|
3 | श्री. विनीत अग्रवाल (भा.पो.से.) | अप्पर पोलीस महासंचालक तथा मुख्य दक्षता आणि सुरक्षा अधिकारी | ६६४०५५१३, ६६४०५४४४, ६६४०५४४५, ६६४०५४४८ cvsomhada@gmail.com |
|
4 | ![]() श्री. धीरजकुमार पंदिरकर |
मुख्य अभियंता - I | मुं.झो.सु.मं. मंडळ, नाशिक मंडळ, छत्रपती संभाजीनगर मंडळ & अमरावती मंडळ | ०२२-६६४०५४२५ dpandirkar1037@mhada.gov.in |
5 | श्री. महेशकुमार जेस्वानी | मुख्य अभियंता - II | मुंबई मंडळ & कोंकण मंडळ | २६५९०६७७, ६६४०५४९१/९९ maheshjeswani37@gmail.com |
6 | ![]() श्री. शिवकुमार आडे |
मुख्य अभियंता - III | मुं. इ. दु. व पु. मंडळ, नागपुर मंडळ & पुणे मंडळ | ६६४०५२०६ mhadace3@gmail.com |
7 | ![]() श्री. अजयसिंह पवार |
वित्त नियंत्रक | ६६४०५४१० fc.mhada.a@mhada.gov.in |
|
8 | ![]() श्री. अनिल वानखेडे |
उपमुख्य कार्यकारी अधिकारी | ६६४०५४२१, ६६४०५४२२ dyceoauth@mhada.gov.in |
|
9 | ![]() श्रीम. मृदुला परब |
विधि सल्लागार | अति. कार्यभार | ६६४०५४३३ legaladvisermhada@gmail.com |
10 | ![]() श्री. पी.डी.साळुंखे |
मुख्य वास्तुशास्त्रज्ञ व रचनाकार | ६६४०५४७७ psalunke1304@mhada.gov.in |
|
11 | श्रीमती निलिमा धायगुडे | सचिव | ६६४०५४५५ |
|
12 | सौ.वैशाली गडपाळे | मुख्य जनसंपर्क अधिकारी | २६५९०९११, ६६४०५०७७ vsandansing1318@mhada.gov.in |
|
13 | श्री. राहुल सुभाष व्हटकर | उपमुख्य अभियंता | दक्षता व गुणनियंत्रण कक्ष / प्रा | ६६४०५२११ rahul.vhatkar33@mah.gov.in |
14 | श्री. एस. जे. ननावरे | उपमुख्य अभियंता | प्रधान मंत्री आवास योजना/प्रा. | ६६४०५४१५ cemhadapmay5@gmail.com |
15 | श्री. वैभव केदारे | कार्यकारी अभियंता | प्रधान मंत्री आवास योजना/प्रा. | ६६४०५४४० ee2pmay@mhada.gov.in |
16 | श्री. राजीव शेठ | उपमुख्य अभियंता | बीपीसी / जीएम | ६६४०५००५ eebpgma2018@gmail.com |
17 | श्री. जयंत पुंडलिक घाडी | कार्यकारी अभियंता- I, अति. कार्यभार | प्राधिकरण | ०२२-६६४०५२०८ ee1mhada@gmail.com |
18 | श्री. नरेंद्र जेमसिंग चव्हाण | कार्यकारी अभियंता- I | दक्षता व गुणनियंत्रण कक्ष / प्रा | ०२२ ६६४०५२३५ naresh.chavan69@mah.gov.in |
19 | श्री. निलेश मधुकर मडामे | कार्यकारी अभियंता- II | दक्षता व गुणनियंत्रण कक्ष / प्रा | ०२२-६६४०५२७६ nilesh.madame78@mah.gov.in |
20 | श्री. रुपेश तोटेवार | कार्यकारी अभियंता | बीपीसी / जीएम | ६६४०५४८८ eebpgma2018@gmail.com |
21 | श्री. अनिल राठोड | कार्यकारी अभियंता | बीपीसी / जीएम | ६६४०५२८६ eebpgma2018@gmail.com |
The Executive Engineer (E.E.) of concerned division will be the Nodal Officer and manage Disaster Management Plan in his area of Operation. The Deputy Chief Engineer of the concerned Circle will be the Zonal Controlling Officer
MBRRB has established a fully air-conditioned Control Room at Rajani Mahal Building, Tardeo that works round the clock with a view to take immediate action in the event of any disaster.
During onslaught of heavy rains the staff strength is adequately increased.
The following staff will be managing the control room:
The Deputy Engineers and Junior Engineers on duty of Control room are associated with one of the most critical function. Their presence and alertness is going to play vital role in saving lives and property. Here are some of the simple and practical tips on safety, which will enable them to effectively discharge their duties
मुंबई बेटावरील दुरुस्ती उपकरप्राप्त इमारतींच्या परतावा अथवा विनापरतावा दुरुस्ती ना हरकत प्रमाणपत्रासाठी पुढील प्रमाणे कार्यप्रणाली अवलंबण्यात येते.
अ.क्र. | घर / दुकान क्र. निवासी/अनिवासी | मजला | भाडेकरूचे / भोगवटादाराचे नाव | वापर | क्षेत्रफळ |
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
भाडेकरू / भोगवटादारांची यादी संबंधीत उप अभियंता यांनी तपासावी, तसेच सदर यादी कार्यकारी अभियंता यांनी प्रमाणित करावी. उपअभियंता यांनी पुढील प्रमाणे प्रमाणित करावी.
भाडेकरू / भोगवटादारांची यादी मी तपासली आहे, व ती बरोबर आढळून आली.
वरील प्रमाणिकरण व खालील कागदपत्रांअभावी प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही.
शासनाच्या गृहनिर्माण विभागाने दि.१६.०९.२००८ रोजी अध्यादेश काढून उपकरप्राप्त इमारतींच्या संरचनात्मक दुरुस्ती खर्चाची प्रचलित प्रमाणित मर्यादा रुपये २०००/- प्रति चौ.मी.इतकी केली आहे.जर संरचनात्मक दुरुस्तीचा खर्च रु.२०००/-प्रति चौ.मी.पेक्षा जास्त येत असेल व प्रचलित प्रमाणीत मर्यादेवरील जास्तीचा खर्च भाडेकरु /रहिवाशी /मालक सोसण्यास तयार असतील तर इमारत दुरुस्तीसाठी घेण्यांत येते.जर भाडेकरु/मालक जास्तीचा खर्च सोसण्यास तयार नसतील तर इमारत म्हाड कायदा १९७६ कलम ८८ (३)(अ) नुसार दुरुस्ती पलिकडे घोषित करुन संयुक्त पुनर्बांधणी योजनेची शक्यता पडताळून पाहण्यांत येते. जर प्रस्ताव तांत्रिकदृष्टया घेणे उचित असेल तर, इमारती व त्या खालील भूखंडाचे भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करुन विकास नियंत्रण नियमावलीत कलम ३३ (९) खाली इमारतींची संयुक्त पुनर्बांधणी योजना हाती घेण्यांत येते. अशा परिस्थितीत इमारतीतील भाडेकरु/रहिवाश्यांची तात्पुरती पर्यायी व्यवस्था मंडळाच्या संक्रमण शिबिरात करण्यांत येते आणि नवीन इमारतीचे काम पूर्ण झाल्यावर त्यांना त्यांच्या मूळ जागी म्हाडाच्या कार्यपध्दतीनुसार प्रस्थापित करण्यांत येते.
म्हाडाच्या प्रचलित धोरणानुसार निवासी भाडेकरु रहिवाश्यांना कमीतकमी २२५ चौ.फूट चटईक्षेत्रफळाचा गाळा किंवा त्यांनी जुन्या इमारतीत व्यापलेले चटई क्षेत्रफळ देण्यांत येते व जास्तीतजास्त ७५३ चौ.फूट चटई क्षेत्रफळ देण्यांत येते. अनिवासी भाडेकरुंच्या बाबतीत त्यांनी जुन्या इमारतीत व्यापलेले चटईक्षेत्रफळ देण्यांत येते. सदयस्थितीत नवीन इमारत पुनर्बांधणीकरिता ४.०० चटईक्षेत्र निर्देशांक वापरण्यांत येतो.
जर एखादया उपकरप्राप्त इमारतींची पुनर्बांधणी विकास नियंत्रण नियमावलीनुसार /आरक्षण किंवा इतर कांही कारणांमुळे शक्य नसते, तेव्हा त्या इमारतीमधील जे भाडेकरु/रहिवाशी मंडळाच्या संक्रमण शिबिरात किंवा इतरत्र राहतात,त्यांना मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडे अस्तित्वात असलेल्या बृहतसूचीवर घेण्यांत येते व त्यांना इतर ठिकाणी बांधलेल्या पुनर्रचित इमारतीत मंडळाकडे उपलब्ध असलेल्या अतिरिक्त गाळे किंवा विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) खालील खाजगी विकासकाकडून मंडळास प्राप्त झालेल्या अतिरिक्त सदनिका वितरीत करण्यांत येतात.
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत करण्यांत येणा-या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्बांधणी कार्यक्रमाचा वेग हा मुंबई शहर बेटावरील सर्व उपकरप्राप्त इमारतींकरिता पुरेसा नसल्याने शासनाकडे पुनर्विकासाची गति वाढविण्यासाठी इमारत मालक,भोगवटदार व रहिवाशी यांचा सहभागाने पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने सन १९८४ साली उपकरप्राप्त इमारतीच्या पुनर्विकासाकरिता २.०० चटईक्षेत्र निर्देशांक देण्याचे धोरण आणले.
सन १९९१ मध्ये शासनाने मुंबई शहराकरिता विकास नियंत्रण नियमावली तयार केली. या नियमावलीमध्ये मुंबई शहर बेटावरील उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास करण्याची तरतूद कलम ३३(७) अंतर्गत करण्यांत येऊन,त्यामध्ये १९८४ साली आखलेले धोरण समाविष्ट केले परंतु भाडेकरु/मालक यांना या योजनेस प्रतिसाद न दिल्याने, शासनाने ही योजना राबविण्यांत येणार्या अडचणींची दखल घेण्याकरिता श्री.सुकटणकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली.
सुकटणकर समितीने शासनास सादर केलेल्या अहवालानुसार सन १९९९ साली विकास नियंत्रण नियमावली ३३(७) मध्ये सुधारणा करण्यांत आली. विकास नियंत्रण नियमावली ३३(७) अंतर्गत केलेल्या सुधारणांचा थोडक्यात तपशील खालीलप्रमाणे :-
अ','ब'व 'क' वर्गातील उपकरप्राप्त इमारतींच्या दोन किंवा जास्त भूखंडांकरिता देण्यांत येणारा अधिकचा प्रोत्साहनात्मक चटईक्षेत्र निर्देशांक खालीलप्रमाणे आहे :-
संयुक्त पुनर्बांधणीसाठी प्रस्तावित भूखंडांची संख्या | अनुज्ञेय चटईक्षेत्र निर्देशांक |
---|---|
अ)एक भूखंड | भूखंडाच्या २.५ पट किंवा रहिवाश्यांच्या पुनर्वसनासाठी लागणारा चटईक्षेत्र निर्देशांक अधिक ५० टक्के प्रोत्साहनात्मक चटईक्षेत्र निर्देशांक यापैकी जो अधिक असेल तो. |
ब) दोन ते पाच भूखंड | भूखंडाच्या २.५ पट किंवा रहिवाश्यांच्या पुनर्वसनासाठी लागणारा चटईक्षेत्र निर्देशांक अधिक ६० टक्के प्रोत्साहनात्मक चटईक्षेत्र निर्देशांक यापैकी जो अधिक असेल तो. |
क) सहा आणि त्यापेक्षा जास्त भूखंड | भूखंडाच्या २.५ पट किंवा रहिवाश्यांच्या पुनर्वसनासाठी लागणारा चटईक्षेत्र निर्देशांक अधिक ७० टक्के प्रोत्साहनात्मक चटईक्षेत्र निर्देशांक यापैकी जो अधिक असेल तो. |
टीप: शासनाने दि.२.३.२००९ रोजी अध्यादेश काढून किमान निवासी अनुज्ञेय चटईक्षेत्र २२५ चौ.फुटांऐवजी ३०० चौ.फूट केले
या विकल्पाअंतर्गत वरील अ मधील अनुक्रमांक १ ते १२ प्रमाणे कार्यप्रणाली आहे.
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरांची मार्च २००९ पर्यंतची सदयस्थिती.
|
||
अ.क्र. |
संक्रमण शिबीराचे नाव
|
एकूण गाळयांची संख्या |
१ | कफ परेड कुलाबा | ४९० |
२ | फिशरमन कॉलनी माहिम | २०० |
३ | वांद्रे-पूर्व | निष्कासित करणे |
४ | वांद्रे-पश्चिम | ४०० |
५ | निर्मलनगर खार-पूर्व | ८० |
६ | जयकोच गोरगांव-पूर्व | ९४० |
७ | ओशिवरा जोगेश्वरी-पश्चिम पाटलीपुत्रनगर (जुने) | निष्कासित |
८ | ओशिवरा जोगेश्वरी-पश्चिम (नवीन) | २०० |
९ | उन्नतनगर गोरेगांव-पश्चिम | १२८ |
१० | सिध्दार्थ नगर गोरेगांव -(नवीन बहुमजली) | ८० |
११ | सिध्दार्थनगर गोरेगांव -पश्चिम | ३७६ |
१२ | महावीर नगर कांदिवली-पश्चिम | ३०० |
१३ | मालवणी (नवीन) | २० |
१४ | मालवणी (जुने) | ३७६ |
१५ | गोराई रोड,बोरिवली -पश्चिम | २०८ |
१६ | गोराई रोड,बोरिवली -पश्चिम | ३१२ |
१७ | गोराई रोड,बोरिवली -पश्चिम | ८० |
१८ | मागाठाणे बोरिवली -पूर्व | ३२० |
१९ | मागाठाणे बोरिवली -पूर्व | १५९ |
२० | मागाठाणे बोरिवली -पूर्व | २३० |
२१ | मागाठाणे बोरिवली -पूर्व | ९६ |
२२ | मागाठाणे बोरिवली -पूर्व | ५२ |
२३ | शैलेंद्रनगर दहिसर-पूर्व | ०८ |
२४ | शैलेंद्रनगर दहिसर-पूर्व | ८१ |
२५ | जिजामाता काळाचौकी | १२२ |
२६ | ज्ञानेश्वर नगर शिवडी | १६० |
२७ | सायन कॅम्प नं.१ | निष्कासित |
२८ | सायन कॅम्प नं.२ | निष्कासित |
२९ | सायन बहुमजली जुने | ३९५ |
३० | सायन अ-विभाग बैठी चाळ | ३०५ |
३१ | सायन बी-विभाग,नवीन इमारत | ९६ |
३२ | सायन सी-विभाग, बैठी चाळ | १५२२ |
३३ | सायन डी-विभाग,बैठी चाळ | २३० |
३४ | सायन ई- विभाग | निष्कासित |
३५ | सहकार नगर, चेम्बुर | निष्कासित |
३६ | सुभाष नगर, चेम्बुर | ५० |
३७ | सुभाषनगर चेंबूर | १९२ |
३८ | मानखुर्द (नवीन )पीएमजीपी | निष्कासित |
३९ | मानखुर्द (जुने ) | ३३६ |
४० | पंतनगर घाटकोपर | १६० |
४१ | कँनरा इंजिनिअरिंग, घाटकोपर | ३३ |
४२ | टागोरनगर (चाळ) | ५६ |
४३ | कन्नमवानगर विक्रोळी पूर्व (बहुमजली ) | १०७३ |
४४ | कन्नमवारनगर विक्रोळी -पूर्व | ८८० |
४५ | कन्नमवारनगर चाळ | १७७ |
४६ | अन्टॉपहिल वडाळा (बहुमजली जुन ९ -अ ) | १२५ |
४७ | अन्टॉपहिल वडाळा(चाळ) | ४७४ |
४८ | वडाळा (बहुमजली नवीन (६ अ अधिक ८ बी ) | २५६ |
४९ | वडाळा (बहुमजली न वीन ( ७ अ,बी,सी ) | २७३ |
५० | धारावी (जुने/नवीन ) | ९१६ |
५१ | भारत नगर वांद्रे-पूर्व | ७१२ |
५२ | गवाणपाडा मुलुंड-पूर्व | ४९६ |
५३ | विनोबाभावे नगर कुर्ला -पश्चिम | ८४० |
५४ | एम.पी.मिल कम्पाऊंड ताडदेव | १६८ |
५५ | सायन (बहुमजली नवीन ) | ७९५ |
५६ | पेरु कम्पाऊंड लालबाग | १२६ |
एकूण = |
१६१०४ |
कार्यकारी अभियंता,
[संक्रमण शिबीर विभाग],
मुं.इ.दु.व.पु मंडळ, मुंबई.
महाराष्ट्र शासनाने सन १९४० साली भाडे नियंत्रण कायदयानुसार गाळयांची भाडी सन १९४० च्या पातळीवर नियंत्रित केल्यामुळे मुंबई शहर बेटावरील भाडेतत्वावरील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्ती व पुनर्रचनेचा प्रश्न सोडविण्यासाठी सन १९६८ साली बेडेकर समितीची स्थापना केली. सदर समितीने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने मुंबई इमारत घरदुरुस्ती व पुनर्रचना कायदा १९६९ मंजूर केला व या कायदयांतर्गत मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाची स्थापना सन १९७१ साली करण्यांत आली.
या कायदयाच्या तरतुदीनुसार जुन्या मोडकळीस आलेल्या भाडेतत्वावरील इमारतींना दुरुस्ती उपकर लागू करण्यांत आला व अशा इमारतींना 'उपकरप्राप्त इमारती ' म्हणून संबोधण्यांत येते. सन १९७७ पर्यंत सदर मंडळ महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत होते. तदनंतर डिसेंबर १९७७ मध्ये सदर कायदयाचा अंतर्भाव महाराष्ट्र गहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम १९७६ मध्ये करण्यांत आला.तदनंतर मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळळाचे नोव्हेंबर १९९२ मध्ये म्हाड कायदा कलम १८ च्या तरतुदीनुसार तीन विभागात विभाजन होऊन, तीन मंडळांची स्थापना झाली.
म्हाड कायदा १९७६ मधील प्रकरण ८ आणि ८-अ मधील तरतुदीनुसार जुन्या उपकरप्राप्त इमारतींच्या दुरुस्तीची व पुनर्रचना करण्याची जबाबदारी मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळास देण्यांत आली आहे
सन १९६९ मधील आणि मार्च २००९ पर्यतच्या उपकरप्राप्त इमारतींचा तपशील : | ||||
---|---|---|---|---|
अ.क्र. | उपकार वर्ग | बांधकामाचे वर्ष | मूळ उपकरप्राप्त इमारतींची संख्या | मार्च २००९ पर्यतच्या उपकरप्राप्त इमारतींची संख्या |
१. | "अ" | दि.१ सप्टेंबर १९४० पूर्वी | १६,५०२ | १३,३६० |
२. | "ब" | दि.१ सप्टेंबर १९४० ते दि.३१ डिंसेबर १९५० पर्यत | १,४८९ | १४७४ |
३. | "क" | दि. १ जानेवारी १९५१ | १,६५१ | १२७० |
एकूण
|
१९,६४२ | १६१०४ |
उपमुख्य अभियंता (प्रकल्प, नियोजन व संकल्पना) या परिमंडळाच्या अधिपत्त्याखाली येत असलेली महत्त्वाची कामे.
उपमुख्य अभियंता (स्थापत्य) या परिमंडळाच्या अधिपत्त्याखाली येत असलेली महत्त्वाची कामे.
उपमुख्य अभियंता (एस.आर.डी.)यांची कार्यपध्दती खालीलप्रमाणे आहे :
बाँम्बे गृहनिर्माण मंडळाची स्थापना १९४८ साली झाली आणि त्यांचे कार्यक्षेत्र संपुर्ण महाराष्ट्रात विदर्भाशिवाय होते. विदर्भ गृहनिर्माण मंडळाची स्थापना सन १९५१ साली झाली. व त्यांची कार्यक्षेत्र विदर्भ प्रदेशात मध्य प्रदेश राज्यात होती.
ही दोन्ही मंडळे निवासी इमारतींचे विविध योजनाअंतर्गत बांधकामाचे काम संस्थाच्या विविध घटकांसाठी करीत.या इमारतींचे वितरणाचे आणि देखभालीचे काम सुध्दा यांच्याकडून पाहिले जात होते. सन १९६० साली राज्याच्या पुनर्बांधणीनंतर विदर्भ गृहनिर्माण मंडळ बाँम्बे गृहनिर्माण मंडळात समाविष्ट केले. या मंडळास नंतर महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ असे संबोधिले जाते. बाँम्बे इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ याची स्थापना बाँम्बे बिंल्डीग रिपेअर बोर्ड कायदा १९६९ अंतर्गत करण्यात आली. महाराष्ट्र झोपडपटटी सुधार मंडळाची स्थापना मुंबई झोपडपटटी सुधार मंडळ कायदा १९७३ अंतर्गत करण्यात आली.
म्हाडाची स्थापना १९७७ च्या कायदा अन्यवे महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ आणि मुंबई झोपडपटटी सुधार मंडळे यांच्या एकत्रिकरण करून म्हाडा कायद्याअंतर्गत मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ आणि मुंबई गृहनिर्माण मंडळ एकत्रित करून बाँम्बे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाची स्थापना केली. १९९२ साली पुन्हा बाँम्बे इमारत व दुरूस्ती पुनर्रचना मंडळाची स्वंतत्ररीत्या बाँम्बे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातून वेगळे करून करण्यात आली. नंतर बाँम्बे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळास नवीन नाव मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ देण्यात आले (म्हाडा).