म्हाडाMaharashtra Housing and Area Development Authority (MHADA)
मुंबई मंडळमुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ
मुं.इ.दु.व पु. मंडळमुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ
मुं.झो.सु. मंडळमुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ
कोंकण मंडळकोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
पुणे मंडळपुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
नाशिक मंडळ नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
औरंगाबाद मंडळ औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
नागपुर मंडळ नागपुर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
अमरावती मंडळ अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ

ताजी बातमी

अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, अमरावती हे म्हाडाचा एक प्रादेशिक घटक असुन या विभागीय मंडळाची स्थापना २२ जुलै,१९९२ ला शासन निर्णय क्रमांक २६७९/बी अन्वये महाराष्ट्र शासनाचे आदेशान्वये करण्यात आली. अमरावती मंडळाचे अधिनस्त असलेल्या मंडळाचे कार्यक्षेत्र हे अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम या ५ जिल्हयांसाठी आहे, सदर जिल्हे यापूर्वी नागपुर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, याचे अधिनस्त होते, नागपुर मंडाळाचे विभाजन करुन अमरावती मंडाळाची निर्मीती करण्यात आली.महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अधिनस्त असलेल्या अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्यालय हे अमरावती येथे असुन सदरहू मंडळावर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, मुंबई,येथून नियंत्रण व देखरेख करण्यात येते.अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ,अमरावती या कार्यालयाचे मुख्यालय,अमरावती येथे गृहनिर्माण भवन,टोपे नगर,मालटेकडी रोड येथील प्रशासकीय इमारतीमध्ये आहे.