उपमुख्य अभियंता (स्थापत्य) या परिमंडळाच्या अधिपत्त्याखाली येत असलेली महत्त्वाची कामे.

  • प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव माननीय मुख्य अभियंता - II /प्राधिकरण यांच्यामार्फत माननीय उपाध्यक्ष प्राधिकरण यांना सादर करणे.
  • अंदाज पत्रकाची तांत्रिकदृष्टया तपासणी करून सदर प्रस्ताव तांत्रिक मंजूरीकरीता माननीय मुख्य अभियंता - II/प्राधिकरण यांना सादर करणे.
  • प्रारूप निवीदा प्रस्तावाची तांत्रिकदृष्टया तपासणी करून सदर प्रस्ताव मंजूरीकरीता माननीय मुख्य अभियंता / प्राधिकरण यांना सादर करणे.
  • निविदा स्विकृती प्रस्तावाची तपासणी करणे.
  • बांधकाम कार्यक्रम, सुधारीत बांधकाम, कार्यक्रम अंदाजपत्रक, सुधारीत अंदाजपत्रक याबाबतची सर्व माहिती जमा करून नोंद करणे.
  • मुंबई मंडळाच्या अधिपत्त्याखाली तसेच सबंधित परिमंडळाशी विधान परिषद / विधान सभा प्रश्नांची उत्तरे शासनास त्वरीत सादर करण्याबाबत सहनियंत्रण करणे.
  • मासिक प्रगती अहवाल माननीय उपाध्यक्ष प्राधिकरण यांना माननीय मुख्य अधिकारी मुंबई मंडळ यांच्यामार्फत नियोजीत वेळेस सादर करणे.
  • २० कलमी कार्यक्रम तसेच बी.एस.यु.पी / प्रकल्पाचा प्रशासकीय अहवाल / प्रगती अहवाल नियोजीत वेळात सादर करणे.
  • विभाग प्रमुख तसेच परिषदेसाठी आवश्यक असलेली तांत्रिक माहिती / अहवाल तयार करून माननीय मुख्य अधिकारी / मुंबई मंडळ यांना सादर करणे.
  • माननीय मुख्य अभियंता /प्राधिकरण यांचेकडून घरबांधणी प्रकल्पाबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावाची तांत्रिक तपासणी करणे.