अभिहस्तांतरण म्हणजे काय?

पार्श्‍वभूमी

म्हाडा अधिनियम १९८१ अंतर्गत विनिमय २१(६) अन्वये म्हाडाच्या मालकीच्या इमारतींचे अभिहस्तांतरण करण्यात येते. मुबंई मंडळाच्या अखत्यारितील अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट, औद्योगिक कामगार, आर्थिक द्रुष्टया दुर्बल, उच्च उत्पन्न गट इत्यादि विविध योजना अंतर्गत वसाहतीतीतल्या इमारती /चाळीतील पात्र रहिवाश्यांना वितरीत केलेले आहेत.

उपरोक्त इमारतीतल्या रहिवाश्यांनी एकत्रित येऊन सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करुन त्याचे अभिहस्तांतरण मुंबई मंडळाकडून केले जाते.

अभिहस्तांतरणाची सद्यस्थिती

मुंबई मंडळाच्या ५६ वसाहतीतील ३७०१ इमारती, १,११,६५९ /- गाळे पैकी १७३७ इमारती, ४५,१६१ गाळयांचे अभिहस्तांतरण झाले असून १९६४ इमारती ६६,४९८ गाळ्यांचे अभिहस्तांतरण व्हायचे.

महाराष्ट्र शासनाचे गृहनिर्माण धोरण

मा.मुख्यमंत्री मा.विलासराव देश्मुख, महाराष्ट्र राज्य यांनी म्हाडाच्या जुन्या इमारतींना २००७ च्या अर्थ संकल्प अधिवेशनात घोषणा केल्यानुसार वाढीव चटई क्षेत्र समान पध्दतीने वाटपाचे धोरण जाहिर केले आहे. यामुळे म्हाडाच्या जुन्या वसाहतीच्या पुनर्विकासास गती मिळणार आहे.पुनर्विकास करावयाचा झाल्यास इमारतींचे अभिहस्तांतरण करणे अत्यंत गरजेचे आहे.

अभिहस्तांतरणाचे सुलभीकरणासाठी म्हाडाने केलेली उपाययोजना ०५/०९/०८ चे परिपत्रक

कार्यपध्दती

अभिहस्तांतरणा बाबतचे ११ टप्पे

  • टप्पा क्र.
    अभिहस्तांतरणाची प्रक्रीया
    कार्यालय
    संपर्क सुचि
  • इमारतींची अंतिम विक्री किंमत अभियांत्रिकी विभागाकडून निश्चित केली जाते.
    अभियांत्रिकी विभाग / सहाय्यक भू व्यवस्थापक
  • इमारतींची संस्था नोंदणी उपनिबंधक / सहकार कक्षाकडून केली जाते.
    उपनिबंधक / मुंबई मंडळ
  • इमारतींचा नकाशा अभियांत्रिकी विभागाकडून तयार केला जातो.
    अभियांत्रिकी विभाग
  • सहकारी गृह निर्माण संस्थेस विक्रीखत व भू भाडे विलेखा कराराचे दस्त मान्यतेसाठी पाठवीले जातात.
    मिळकत व्यवस्थापक / समाज विकास विभाग
  • सहकारी गृह निर्माण संस्थेने सर्वसाधारण सभेत विक्रीखत व भू भाडे विलेखा कराराच्या दस्तास मंजूरी घेतात.
    सहकारी गृह निर्माण संस्था
  • सहकारी गृह निर्माण संस्थेने दस्तास मंजूरी दिली परंतू काही प्रकरणे जमिन वा तत्सम बाबींसाठी प्रलंबीत राहतात.
    सहकारी गृह निर्माण संस्था
  • सहकारी गृह निर्माण संस्थेने विक्रीखत व भू भाडे विलेखा कराराच्या दस्तास मान्यता दिल्यावर मिळकत व्यवस्थापक कार्यालय संस्थेकडील मंडळाची थकीत रक्कमेचा तपशील तयार करतात.
    मिळकत व्यवस्थापक
  • मिळकत व्यवस्थापक कार्यालयाकडून सहकारी गृह निर्माण संस्थेकडील थकीत रक्कमेबाबत लेखी अवगत करुन ती रक्कम भरुन घेतली जाते.
    सहकारी गृह निर्माण संस्था
  • विक्रीखत व भू भाडे विलेखा कराराचे दस्ताचे प्रारुप तयार करुन मिळकत व्यवस्थापक ते दस्त अंतीम स्वरुप देणेसाठी विधी सल्लागार/प्राधिकरण यांचे कडे पाठवतात.
    मिळकत व्यवस्थापक/ विशेष कार्य अधिकारी / उपमुख्य अधिकारी/ मुख्य अधिकारी / विधी सल्लागार
  • १०
    विधी सल्लागार /प्राधिकरण प्रस्तावाची छाननी करुन त्रूटयांबाबत पूर्तता करुन प्रस्ताव अंतीम केला जातो. 
    मिळकत व्यवस्थापक
  • ११
    विक्री करार व भू भाडे विलेखा कराराचे दस्त मुद्रांक शुल्क भरण्यासाठी तसेच निष्पादित करणेस संस्थेस दिले जातात.
    सहकारी गृह निर्माण संस्था मुद्रांक शुल्क कार्यालय
आवश्यक कागदपत्रे
अभिहस्तांतरणासाठी गाळेधारकांनी करावयाची पूर्तता
  • आपल्या इमारतीतील गाळेधारकांची यादी तयार करुन अभिहस्तांतरणाची प्रक्रीया सुरु करण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांची स्थापना करा.
  • सहकारी गृहनिर्माण संस्थांची स्थापना करण्याचा एक भाग म्हणजे नाव आरक्षण प्रस्ताव उप निबंधक सहकारी संस्था यांना सादर करणे यासाठी
    • मुख्य प्रवर्तकाचा सहकारी गृहनिर्माण संस्थांचा नाव आरक्षण करण्यासंबंधीचा विनंती अर्ज.
    • नाव आरक्षण करण्यासंबंधीचा छापील अर्ज.
    • मुख्य प्रवर्तक निवडीबाबत संस्थेच्या सभेच्या इतीवृत्त.
  • सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणीसाठी
    • स्टेटमेंट सी प्रत-१
    • ए बी स्टेटमेंट २ प्रती
    • ६६ फाँर्म एक्स-१
    • सोसायटीच्या १० प्रवर्तकाचे प्रतिद्यापत्र
    • बायलाँज प्रती-४
    • रिझर्व्ह बँक चलनाची मूळ प्रत
    • संस्थेच्या कामकाजाची योजना
    • संस्थेच्या जमाखर्चाचा तक्ता
    • बँक बँलन्स प्रमाणपत्र मूळ प्रत
    • नाव आरक्षण पत्राची छायाप्रत
    • मुख्य प्रवर्तकाचा अभिवचन
    • मुख्य प्रवर्तकाचा विनंती अर्ज
  • आपल्या संस्थेतील हस्तांतरण प्रकरणे त्वरीत नियमीत करुन घेणेसाठी संबंधित मिळकत व्यवस्थापक यांचेकडे कागदपत्रासह रितसर अर्ज करा.
  • मुंबई मंडळाने दिनांक ०५/०९/०८ च्या परिपत्रकानुसार केलेल्या उपाय योजना नुसार आपल्या इमारतींचे अभिहस्तांतरण त्वरेने पूर्ण करण्यासाठी सक्रिय पुढाकार घ्या.
  • उप निबंधक सहकारी कक्ष यांचे कडून संस्था नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यावर मिळकत व्यवस्थापकाकडे रितसर अर्ज करा.
  • अभिहस्तांतरणाची प्रक्रीया माहिती करुन घेण्यासाठी संबंधित मिळकत व्यवस्थापकाशी चर्चा करुन कामाची रुपरेखा ठरवून घ्या.
  • भू भाडे विलेखा करार व विक्री खताचे मसूदे संस्थेची सर्व साधारण सभा आयोजित करुन त्यांत विहीत ठरावास मंजूरी घेऊन मिळकत व्यवस्थापक कार्यालयाकडे लवकर सादर करा.
सद्यस्थिती
  • अ.क्र.
    कार्यालय
    एकूण इमारती
    एकूण गाळे
    अभिहस्तांतरण झालेल्या
    अभिहस्तांतरण न झालेल्या
  • इमारती
    गाळे
    इमारती
    गाळे
  • मि.व्य. १
    ७९२
    २०२७६
    ५९३
    १३११२
    १९९
    ७१६४
  • मि.व्य. २
    ७८८
    २२९४७
    ४९५
    १२१३१
    २९३
    १०८१६
  • मि.व्य. ३
    १०९८
    ३०८८९
    ३९६
    ८८४६
    ७०२
    २२०४३
  • मि.व्य. ४
    ४३९
    १५४९५
    २२९
    ७३२८
    २१०
    ८१६७
  • मि.व्य. ५
    ५८४
    २२०५२
    १०४
    ३७४४
    ४८०
    १८३०८
  •  
    एकूण
    ३७०१
    १११६५९
    १७३७
    ४५१६१
    १९६४
    ६६४९८