Nagpur History - Mr

विदर्भ गृहनिर्माण मंडळ सन १९५१ पासून स्वतंत्ररित्या विदर्भात कार्यरत होते. त्यानंतर नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ हे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा प्रादेशिक घटक म्हणून विदर्भाच्या ९ जिल्हयात ५ डिसेंबर, १९७७ पासून कार्यरत होते. दि. १३/७/१९९२ रोजी अमरावती मंडळाची स्थापना झाली असून,नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ हे नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया या सहा जिल्हयात कार्यरत आहे.